शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 05:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

लखनौ : लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान झाले असून, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी होणार आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेसमधील शब्दयुद्धही तीव्र होत चालले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास तयार आहोत, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए. पी. शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या सार्वजनिक चर्चेसाठी आमंत्रित केले आहे.

मी १०० टक्के तयार आहे, पण ‘ते’ आलेत का?nशुक्रवारी राजधानी लखनौमध्ये उपस्थित असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी ‘मी पंतप्रधानांसह कोणाशीही कोणत्याही व्यासपीठावर वादविवादास १०० टक्के तयार आहे, पण मला माहीत आहे ते माझ्याशी वादविवाद करणार नाहीत. nआमच्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही अशाचप्रकारे वादविवाद करू शकतात,” असे स्पष्ट केले.

लिहून घ्या; भाजप निवडणूक हरणार राहुल गांधी आणि यादव यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी ‘इंडिया’च्या प्रचारसभेला संबोधित केले. “तुम्ही माझ्याकडून लेखी घ्या, भाजप निवडणूक हरणार आहे,” असा विश्वास व्यक्त करीत राहुल यांनी भारत जोडो, न्याय यात्रा आणि विरोधी प्रचारसभांचा उल्लेख केला. इंडिया आघाडीने गेल्या काही वर्षांत आवश्यक निवडणूक तयारी केली आहे. द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकानेही उघडली गेली, असे ते म्हणाले. 

राहुल गांधींनी चौकशीची मागणी करणे योग्यचदोन उद्योगपतींनी काँग्रेसला पैसे पाठवल्याच्या पंतप्रधानांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. या आरोपांकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यांची चौकशी करण्याची मागणी करणे योग्यच आहे. - पी. चिदंबरम, नेते, काँग्रेस

राहुल गांधी, रेवंत रेड्डी यांचा शहर बसमधून प्रवासलोकसभा प्रचारादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हैदराबाद शहरात शहर बसने एकत्र प्रवास करताना दिसले. त्यांच्यासोबत सामान्य लोकही प्रवास करताना दिसत होते. या प्रवासाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी या दोन्ही नेत्यांनी प्रचारसभेत संबोधित केले होते.

काँग्रेस हिंदुविरोधी पक्ष; जनतेला लुटणे हा त्यांचा इतिहास : माेदीहैदराबाद : काँग्रेस हिंदूविरोधी असून जनतेला लुटणे, काही जणांचे लांगुलचालन करणे, घराणेशाही जोपासणे हा त्या पक्षाचा इतिहास आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायद्याला काँग्रेस पक्ष विरोध करतो. व्होट जिहादची भाषा केली जाते. अशा प्रवृत्तींना जनतेने पराभूत करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४