CoronaVirus: व्हॉट्सअ‍ॅपवर एक्स-रे पाठवा, कोरोना आहे की नाही ते कळेल; मोफत XraySetu सेवा लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:02 PM2021-06-02T20:02:54+5:302021-06-02T20:03:46+5:30

how Centre's X-Ray Setu on WhatsApp can detect Corona: ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीय. चला जाणून घेऊया XraySetu काय आहे, कसे वापरावे....

Reading X-ray via WhatsApp: AI-driven 'XraySetu' helps doctors detect Corona in rural area | CoronaVirus: व्हॉट्सअ‍ॅपवर एक्स-रे पाठवा, कोरोना आहे की नाही ते कळेल; मोफत XraySetu सेवा लाँच

CoronaVirus: व्हॉट्सअ‍ॅपवर एक्स-रे पाठवा, कोरोना आहे की नाही ते कळेल; मोफत XraySetu सेवा लाँच

googlenewsNext

केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात देशवासियांसाठी एक मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. कोरोना आहे की नाही हे मिनिटांत कळण्यासाठी XraySetu सुविधा मोफत देऊ केली आहे. याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर छातीचा एक्स-रे पाठवून कोरोनाची बाधा आहे की नाही हे कळविले जाणार आहे. (Know how Centre's X-Ray Setu on WhatsApp can detect Covid-19)


ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीय. चला जाणून घेऊया XraySetu काय आहे, कसे वापरावे....


खरेतर XraySetu हे एक एआय बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. जो व्हॉट्सअ‍ॅपवर ऑपरेट केला जातो. ही सुविधा इंडियन इन्स्टट्यूट ऑफ सायन्स (IISc) द्वारे स्थापित एनजीओ Artpark (AI & Robotics Technology Park) आणि भारत सरकारच्या विद्यमाने सुरु करण्यात आली आहे. ही सेवा डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी (DST)ने एक हेल्थटेक स्टार्टअप Niramai सोबत मिळून डेव्हलप केली आहे. 


ग्रामीण भागात छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे सुविधा असते. मात्र, या भागात RT-PCR  किंवा CT-Scan करणे कठीण असते. लोकांना परवडणारे देखील नसते. यामुळे XraySetu द्वारे एक्स रे वरून कोरोना आहे की नाही याची माहिती मिळणार आहे, असे  Artpark चे सीईओ उमाकांत सोनी यांनी सांगितले. 


- पुढील सहा ते 8 महिने ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. जरी शुल्क असले तरीदेखील ते 100 रुपयांपेक्षा कमी असेल. ही सुविधा गेल्या आठवड्यापासून सुरु झाली असून 500 डॉक्टर याचा वापर करत ाहेत. पुढील 15 दिवसांत 10000 डॉक्टरांचे नेटवर्क बनविण्याची योजना आहे. 
- एक्स रे पाठविल्यावर 10 ते 15 मिनिटांत त्याचा रिपोर्ट तयार केला जातो. लो रिझोल्युशनच्या एक्सरेवरूनही कोरोना बाधित तपासता येणार आहे. 


XraySetu कसे काम करणार...

  • https://wwww.xraysetu.com वर जावे. ‘Try the Free X-raySetu Beta’ बटनावर क्लिक करावे. 
  • दुसऱ्या पेजवर गेल्यावर तुमच्या वेब किंवा स्मार्टफोनमध्ये वॉट्सऐप-बेस्ड चॅटबोट निवडू शकता. 
  • तो डॉक्टरला XraySetu सेवा सुरु करण्यासाठी +91 8046163838 या क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सांगेल. 
  • रुग्णाचा छातीचा एक्सरे काढलेला फोटो तिथे पाठवावा लागणार आहे. यानंतर काही वेळातच ऑटोमेटेड रिपोर्ट देण्यात येईल. 
     

Web Title: Reading X-ray via WhatsApp: AI-driven 'XraySetu' helps doctors detect Corona in rural area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.