वाचक पत्र : कुर्डूवाडीची वाहतूक कोंडी सुटेना

By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:02+5:302015-07-15T00:15:02+5:30

कुर्डूवाडी शहर हे मराठवाडा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार आहे़ या कुर्डूवाडी-बार्शी रोडवर रेल्वेगेटमध्ये अनेक खासगी जीप, टेम्पो, रिक्षा व इतर वाहने दोन्ही बाजूस उभी राहतात़ रेल्वेगेट बंद झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते़ गेट उघडल्यानंतर एकाच वेळी निघतात़ त्यामुळे लहान-मोठे अपघात वारंवार होतात़ वाहन चालविताना कोणी नियम पाळत नाहीत़ पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ वाहतुकीस अडथळा आणणार्‍या गोष्टी दूर केल्या पाहिजेत़ त्यासाठी या ठिकाणी चौक परिसरात एका पोलिसाची नियुक्ती करणे गरजेचे आहे़ अशा ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था असणे जरूरीचे आहे़ तसेच शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे़ याकडे नगरपालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे़ तरी तातडीने लक्ष देऊन नगरपालिका प्रशासनाने शहर स्वच्छ करावे़

Reader Letter: Transport of Kurduvadi Kondi Takeenna | वाचक पत्र : कुर्डूवाडीची वाहतूक कोंडी सुटेना

वाचक पत्र : कुर्डूवाडीची वाहतूक कोंडी सुटेना

र्डूवाडी शहर हे मराठवाडा आणि पंढरपूर तीर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार आहे़ या कुर्डूवाडी-बार्शी रोडवर रेल्वेगेटमध्ये अनेक खासगी जीप, टेम्पो, रिक्षा व इतर वाहने दोन्ही बाजूस उभी राहतात़ रेल्वेगेट बंद झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते़ गेट उघडल्यानंतर एकाच वेळी निघतात़ त्यामुळे लहान-मोठे अपघात वारंवार होतात़ वाहन चालविताना कोणी नियम पाळत नाहीत़ पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ वाहतुकीस अडथळा आणणार्‍या गोष्टी दूर केल्या पाहिजेत़ त्यासाठी या ठिकाणी चौक परिसरात एका पोलिसाची नियुक्ती करणे गरजेचे आहे़ अशा ठिकाणी कायमस्वरूपी व्यवस्था असणे जरूरीचे आहे़ तसेच शहरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे़ याकडे नगरपालिका प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत आहे़ तरी तातडीने लक्ष देऊन नगरपालिका प्रशासनाने शहर स्वच्छ करावे़
-एस़एऩकुंभार
कुर्डूवाडी.

Web Title: Reader Letter: Transport of Kurduvadi Kondi Takeenna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.