(वाचली) दोन मोटारसायकलींची धडक, दोन महिला गंभीर *लिशा हॉटेल चौकात अपघात

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

कोल्हापूर : लिशा हॉटेल चौकात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन मोपेडवरील दोन महिला गंभीर जखमी झाल्या. प्रीती अजय श्रीवास्तव व युगंधरा संजय घोरपडे (रा. लिशा हॉटेल परिसर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज, रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाला.

(Read) two motorcycle strikes, two women critically * Accident in Lisa Hotel Chowk | (वाचली) दोन मोटारसायकलींची धडक, दोन महिला गंभीर *लिशा हॉटेल चौकात अपघात

(वाचली) दोन मोटारसायकलींची धडक, दोन महिला गंभीर *लिशा हॉटेल चौकात अपघात

ल्हापूर : लिशा हॉटेल चौकात दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन मोपेडवरील दोन महिला गंभीर जखमी झाल्या. प्रीती अजय श्रीवास्तव व युगंधरा संजय घोरपडे (रा. लिशा हॉटेल परिसर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज, रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, प्रीती श्रीवास्तव व युगंधरा घोरपडे या दोघी मोपेडवरून गांधीनगर येथून खरेदी करून घरी येत होत्या. त्या दोघी लिशा हॉटेल चौकात येताच समोरुन येणार्‍या प्रवीण शिवाजी हराळे व मंगेश माळी यांच्या दुचाकीशी त्यांची समोरासमोर धडक बसली. त्यामध्ये प्रीती व युगंधरा यांना गंभीर दुखापत झाली. अपघात होताच वाहनधारकांनी मोठी गर्दी केली. जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. प्रवीण हराळे हा शिवाजी विद्यापीठात परीक्षेसाठी मिरजहून आला होता. तोही या अपघातात किरकोळ जखमी झाला. या प्रकरणी सीपीआर पोलीस चौकीत नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: (Read) two motorcycle strikes, two women critically * Accident in Lisa Hotel Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.