(वाचली) थेट पाईप लाईनसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा : पाटील

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:57+5:302014-12-20T22:27:57+5:30

कोल्हापूर : शहराच्या स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येणार्‍या काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या पूर्ततेसाठी आता शहराचेआमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज रात्री येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

(Read) Shivsena should take the lead for direct pipeline: Patil | (वाचली) थेट पाईप लाईनसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा : पाटील

(वाचली) थेट पाईप लाईनसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा : पाटील

ल्हापूर : शहराच्या स्वच्छ व मुबलक पिण्याच्या पाण्यासाठी राबविण्यात येणार्‍या काळम्मावाडी थेट पाईप लाईन योजनेच्या पूर्ततेसाठी आता शहराचेआमदार म्हणून राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माजी मंत्री सतेज पाटील यांनी आज रात्री येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.
महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात सतेज पाटील बोलत होते. यावेळी सचिन चव्हाण यांच्यातर्फे प्रभागातील कचरा उठावासाठी ई रिक्षा ,करुणालय संस्थेला कपाटे प्रदान,गणवेश वाटप,अंधशाळेतील मुलांना देणगी, सिध्दाळा गार्डनमध्ये खेळणी प्रदान करण्यात आली.
थेट पाईप लाईन योजनेला वन विभागाची अडचण निर्माण झाली असून त्यातून मार्ग काढण्याची भुमिका क्षीरसागर यांनी घ्यावी, असे सांगत सतेज पाटील यांनी ही योजना आम्ही मंजूर करुन आणली. त्याला निधीही मिळाला आहे. आता सत्तेत कोणतेही पक्ष असोत,शहराच्या विकासासाठी सगळे मिळून आपण प्रयत्न करुया असे आवाहन केले. चव्हाण कुटुंबीय स्पष्ट बोलणारे असले तरी त्यांची भुमिका सरळ असते,त्यामागे विकासाची आस असते,असेही पाटील म्हणाले.
ऐतिहासिक वारसा असलेली नाथागोळे तालमीची इमारत बांधून देण्याची घोषणा राजेश क्षीरसागर यांनी यावेळी केली. तसेच आपल्या आमदार फंडातून एक ई रिक्षाही देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी नगरसेवक आदिल फरास यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर.के.पोवार, नगरसेवक राजेश लाटकर,लालासाहेब गायकवाड यांची भाषणे झाली. शाहीर आझाद नायकडी यांनी सुत्रसंचालन केले.
मनपा आघाडीत बदल नाही
समारंभात स्थायी समिती सभापती पदावरुन चांगलीच जुगलबंदी झाली. सचिन चव्हाण यांनी चांगले काम केले आहे, सतेज पाटील यांनी त्यांना मुदतवाढ द्यावी अशी सुचना राजेक्ष लाटकर यांनी केली. तर त्याचा संदर्भ घेत , आमची त्यास हरकत असायचे कारण नाही,पण सभापतीपदी राष्ट्रवादीकडे जाणार आहे.त्यामुळे मुश्रीफ साहेबांची परवानगी घ्या अशा शब्दात पाटील यांनी चिमटा काढला. पण लगेचच ठरल्या प्रमाणे सर्व काही होणार आहे,आघाडीत बदल होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
समारंभास महापौर तृप्ती माळवी, जि.प.उपाध्यक्ष शशिकांत खवरे, परिवहन सभापती वसंत कोगेकर,शिक्षण मंडळ सभापती संजय मोहिते, महिला बाल कल्याण सभापती रोहिणी काटे, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: (Read) Shivsena should take the lead for direct pipeline: Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.