(वाचली) वाढदिवस

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

२१ डिसेंबर रोजी होणारा वाढदिवस

(Read) birthday | (वाचली) वाढदिवस

(वाचली) वाढदिवस

वाग्राम : येथील नई तालीम समितीच्या शांती भवनमध्ये यंदाचा माँ बाबा सन्मान पुरस्काराचे रविवारी सेवाग्राम येथे वितरण झाले. यंदाचा पुरस्कार गुजरातमधील राजपुरा या गावात कार्य करणार्‍या बिंदू व पार्थेश या दाम्पत्याला देण्यात आला. गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू अरूण दवे यांच्या हस्ते त्यानी पुरस्कार स्वीकारला.
कार्यक्रमाला नई तालिम समितीचे अध्यक्ष डॉ. सुगन बरंठ, अनुभूती शाळा जळगावच्या संचालिका निशा जैन आदींची यावेळी उपस्थिती होती. बिंदू व पार्थेश यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बिंदू म्हणाल्या, देशात अनेक प्रश्न आहेत, समस्या आहेत. या सर्वांचे मूळ मात्र शिक्षण आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रेम, जबाबदारीची जाणीव करून देण्याची गरज आहे. शिक्षक हा जबाबदार असून आवाहन पेलण्यास सक्षम आहे. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्र्यांना आदर्श नाही तर यशस्वी नागरिक बनविणे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: (Read) birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.