(वाचली) ४७ हजार बालकांना उद्या पोलिओचा डोस पुन्हा २२ फेब्रुवारीला मोहीम मनपा प्रशासनाची तयारी पूर्ण
By Admin | Updated: January 14, 2015 23:40 IST2015-01-14T23:16:22+5:302015-01-14T23:40:46+5:30
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. १८) व २२ फेब्रुवारीला दोन सत्रांत शहरातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या या २०व्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात ४७ हजार ३९७ तर दुसर्या टप्प्यात ४८ हजार ४०२ बालकांना पोलिओचे डोस देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन उपायुक्त अश्विनी वाघमळे व आरोग्य आधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केले.

(वाचली) ४७ हजार बालकांना उद्या पोलिओचा डोस पुन्हा २२ फेब्रुवारीला मोहीम मनपा प्रशासनाची तयारी पूर्ण
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. १८) व २२ फेब्रुवारीला दोन सत्रांत शहरातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. यंदाच्या वर्षीच्या या २०व्या मोहिमेत पहिल्या टप्प्यात ४७ हजार ३९७ तर दुसर्या टप्प्यात ४८ हजार ४०२ बालकांना पोलिओचे डोस देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन उपायुक्त अश्विनी वाघमळे व आरोग्य आधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केले.
शहरातील ए, बी, सी, ई व डी या पाच वॉर्डात एकूण १७२ लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत ही मोहीम चालणार आहे. सर्व केंद्रांवर मिळून बाराशे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शहरात ध्वनिक्षेपकांवरून जनजागृती करण्यात येणार आहे. यादिवशी दिवसांतून तीनवेळा अग्निशमन केंद्र व राजाराम कारखान्याचा भोंगा (सायरन) वाजविण्यात येणार आहे.
पोलिओचा डोस केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. पोलिओ या अपंगत्व निर्माण करणार्या रोगापासून नव्या पिढीची कायमची सुटका करण्यासाठी नागरिकांनी ० ते ५ वयोगटांतील बालकांना पोलिओ डोस द्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे डॉ. दिलीप पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
--------------
पल्स पोलीओ लसीकरणाच्या मोहिमेची माहिती शहरातील सर्व तरुण मंडळांनी वार्ताफलकावर प्रसिद्ध करावी. परिसरातील बालकांना पोलिसो डोस पाजण्याबाबत प्रवृत्त करा.
- उपायुक्त अश्विनी वाघमळे
========================
१८ जानेवारी -४७ हजार ३९७
२२ फेब्रुवारी- ४८ हजार ४०२ (बालकांना पोलिओचे डोस)
सकाळी ८ ते सायं. ५
१७२ केंद्रे
१२०० कर्मचारी तैनात
महालक्ष्मी मंदिरात विशेष केंद्र
-------------------