शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्ससाठी पुन्हा संधी; २४ मेपर्यंत अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:02 IST

अ‍ॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे

- एस. के. गुप्ता

नवी दिल्ली : विदेशांत अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे स्वप्न कोविड-१९ मुळे भंगलेल्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्ससाठी दुसऱ्यांदा अर्ज उपलब्ध केले आहेत. यामुळे इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी जेईई मेन्सचा अर्ज भरू न शकलेले विद्यार्थी २४ मेपर्यंत अर्ज करू शकतील. अ‍ॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे. २५ ते ३१ मे दरम्यान जुन्या आणि नव्या अर्जांत दुरुस्तीची संधी विद्यार्थ्यांना आहे. ही मात्र शेवटची संधी आहे. जेईई मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलै, २०२० दरम्यान तर जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा २३ आॅगस्ट, २०२० रोजी होईल.काय म्हणाले मंत्री निशंक- मंत्री निशंक यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षणाचा विचार सोडून दिला त्यांना भारतात शिक्षणाची संधी दिली जात आहे.- कोणत्याही कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना २४ मे रोजी सायंकाळ पाच वाजेपर्यंत अर्ज करता येतील. शुल्क रात्री ११.३० वाजेपर्यंत डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे करता येईल. जेईई मेन्समध्ये दुरुस्तीची संधी २५ ते ३१ मे दरम्यान पुन्हा दिली जाईल.- आधीच रजिस्ट्रेशन केलेल्या ८.३२ लाख विद्यार्थ्यांनाही त्यांच्या फॉर्ममध्ये दुरुस्तीची संधी दिली गेली आहे. विशेषत: कोविड-१९ मुळे विद्यार्थ्याला आपले केंद्र जर दुसºया शहरात हवे असेल तर त्याने त्याला पहिल्या क्रमांकावर प्राधान्य द्यावे.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण