शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 09:10 IST

Bengaluru Stampede : बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली.

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाच्या जल्लोषादरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमासाठी हजारो लोक स्टेडियमच्या आत जमले होते. सुरुवातीला या कार्यक्रमासाठी पास देण्यात आले होते. परंतु काही लोकांनाच पास मिळाला आणि जेव्हा सर्वांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा गेट उघडताच मोठी गर्दी झाली.

हजारो लोकांनी जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला आणि सर्व दिशांनी लोक आत येऊ लागले. प्रवेशद्वाराचा रस्ता छोटा होता. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि बॅरिकेड खाली पडले. काही वेळातच लोक त्याखाली दबले गेले आणि गर्दीने त्यांना चिरडलं. पोलिसांनी जखमी आणि बेशुद्ध लोकांना उपचारासाठी ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, ज्यांना पास मिळाले आणि ज्यांना मिळाले नाहीत ते दोन्ही लोक आत धावले. 

 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांचे मृतदेह बॉरिंग हॉस्पिटलमध्ये आहेत आणि इतर चार जण वैदेही हॉस्पिटलमध्ये आहेत. सहा जणांवर वैदेही हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी बॉरिंग हॉस्पिटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी ११ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत आणि जखमींवर सरकारकडून मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे.

"लाखो लोक आले होते"

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी कार्यक्रमस्थळी झालेल्या गर्दीबद्दल आधीच माफी मागितली आहे. "आम्ही ५,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. लाखो लोक आले होते... कार्यक्रम १० मिनिटांत संपला. आम्ही सर्वकाही सामान्य करण्याचा प्रयत्न करत आहोत... ही उत्साही तरुणांची गर्दी आहे" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :Bengaluru Stampedeबंगळुरुमध्ये चेंगराचेंगरीPoliceपोलिसRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर