पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम?
By Admin | Updated: August 4, 2014 03:38 IST2014-08-04T03:38:50+5:302014-08-04T03:38:50+5:30
यंदा मान्सून कमजोर राहण्याची शक्यता आहे. महागाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवूशकते

पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम?
नवी दिल्ली : यंदा मान्सून कमजोर राहण्याची शक्यता आहे. महागाईवर याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रिझर्व्ह बँक आपल्या पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवूशकते. मंगळवारी रिझर्व्ह बँक पतधोरण सादर करणार आहे.
किरकोळ महागाई अजूनही ८ टक्क्यांवर कायम आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यास प्राधान्य असल्याने रिझर्व्ह बँकेवर याचा दबाव राहणार आहे. जीवनोपयोगी वस्तूंचे भाव अजूनही चढे आहेत. मान्सूनच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. खाद्यवस्तूंचे भाव चढे असण्याची शक्यता आहे. जुलैअखेरपर्यंत मान्सूनमध्ये २३ टक्क्यांची तूट नोंदली गेली. भारतीय स्टेट बँकेच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी पतधोरणात प्रमुख व्याजदर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, धोरणात्मक व्याजदर कायम राहण्याची शक्यता आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)