RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 04:39 PM2022-06-06T16:39:19+5:302022-06-06T16:39:36+5:30

RBI On Currency Notes: अर्थ मंत्रालय आणि RBI रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचे फोटो नोटांवर लावणार असल्याच्या बातम्या काही मीडियामध्ये आल्या होत्या.

RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI | RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

RBI On Currency Notes: नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो हटवणार? RBI दिली महत्वाची माहिती

googlenewsNext

RBI On Mahatma Gandhi: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने सध्याच्या चलनात असलेल्या नोटांवरुन राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो काढून टाकल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. आरबीआयने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'आरबीआय सध्याच्या चलनात असलेल्या नोटांवरुन महात्मा गांधींचा फोटो बदलून इतर काही लोकांच्या फोटोसह नवीन नोटा छापण्याची तयारी करत आहे, अशी चुकीची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत आहे.' आरबीआयच्या म्हणण्यानुसार असा कोणताही प्रस्ताव आरबीआयसमोर नाही.

आरबीआयने दिला नकार 
काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले होते की, वित्त मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँक नवीन सीरीज नोटांवर रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती एपीजे कलाम यांचा फोटो छापण्याचा विचार करत आहेत. या वृत्ताचे खंडन करण्यासाठी आरबीआयला पुढे यावे लागले. आरबीआयने ट्विट करून एक प्रेस रिलीझ जारी केले आणि स्पष्ट केले की सध्याच्या चलन आणि नोटांमध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

अफवेवर आरबीआयचे स्पष्टीकरण 
मीडियातून एक वृत्त आले होते की, अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या आरबीआय आणि सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मीटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे कलाम यांचे वॉटरमार्क सेट आयआयटी दिल्लीतील प्रोफेसर दिलीप टी साहनी यांना पाठवून त्यापैकी एकाची निवड करण्यास सांगितले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव सरकारसमोर ठेवला जाईल. त्यावर सरकार अंतिम निर्णय घेईल. पण, आता आरबीआयने स्पष्टपणे या अफवांचे खंडन केले आहे.

Web Title: RBI On Currency Notes: Will Mahatma Gandhi's photo be removed from notes? Important information provided by RBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.