रावत-फडणवीस आमने-सामने!

By Admin | Updated: December 14, 2014 01:21 IST2014-12-14T01:21:27+5:302014-12-14T01:21:27+5:30

नियोजन आयोग गुंडाळण्याच्या मुद्यावरून राज्यांचे मुख्यमंत्री आमने-सामने आल्याचे चित्र तूर्तास दिसत आह़े नियोजन आयोग गुंडाळल्यास देशात अनिश्चितता निर्माण होईल,

Rawat-Fadnavis face-to-face! | रावत-फडणवीस आमने-सामने!

रावत-फडणवीस आमने-सामने!

>नवी दिल्ली : नियोजन आयोग गुंडाळण्याच्या मुद्यावरून राज्यांचे मुख्यमंत्री आमने-सामने आल्याचे चित्र तूर्तास दिसत आह़े नियोजन आयोग गुंडाळल्यास देशात अनिश्चितता निर्माण होईल, असे सांगत उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांनी यास तीव्र विरोध केला आह़े याउलट नियोजन आयोग गुंडाळल्यानंतर अस्तित्वात येणारी नवी व्यवस्था राज्यांना जादा अधिकार देईल, असे मत भाजपाशासित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आह़े
शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेस नेते हरीश रावत यांनी नियोजन आयोग गुंडाळण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांवर जोरदार टीका केली़ नियोजन आयोग ही एक काळासोबत सिद्ध झालेली संस्था आह़े संसदीय चौकटीत सर्व राज्यांना न्याय्य वागणूक देण्याचे प्रयत्न या संस्थेकडून झाले आहेत़ सर्वसहमतीचा पर्याय पुढे येत नाही, तोर्पयत नियोजन आयोग भंग करण्याबाबत बोलले जायला नको, असे रावत म्हणाल़े कारण गत सहा महिन्यांपासून देशात अनिश्चिततेचे वातावरण पसरले आह़े हे देशासाठी योग्य नाही, असेही ते म्हणाल़े याच कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी नियोजन आयोग भंग करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांचे जोरदार समर्थन केल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Rawat-Fadnavis face-to-face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.