शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

Pulwama Attack : रावळपिंडी कनेक्शन; अझहरचे पाकिस्तान लष्कराच्या हॉस्पिटलमधून आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 07:32 IST

झहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे. 

श्रीनगर : काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याला जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनेच पाकिस्तानी लष्कराच्या तळावरून मंजुरी दिली होती, असा धक्कादायक खुलासा समोर येत आहे. अझहर गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी येथील आर्मी बेसमधील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तेथूनच त्याने जवानांवर हल्ला करण्याचे आदेश दिल्याचे तपासात उघड झाले आहे. 

जैश-ए-मोहम्मद ही संघटना सुरू करणारा क्रूरकर्मा दहशतवादी मसूद अजहर हा पूर्वी काश्मीरमध्ये हरकत-उल-मुजाहिदीन या संघटनेत सक्रीय होता. त्याला भारतीय जवानांनी १९९४ मध्ये अटक केली. त्याच्या सुटकेसाठी अनेकदा  दहशतवाद्यांनी प्रयत्नही केले होते. पण, ते फसले होते. त्यानंतर २४ डिसेंबर १९९९ रोजी १८० प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. ते विमान कंदाहार येथे उतरवले. अपहृत विमान प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी मसूद, मुश्ताक जरगर आणि शेख अहमद उमर सईद यांना सोडण्याची मागणी केली. सहा दिवसांच्या वाटाघाटीनंतर भारताने या तिघांनाही सोडले. प्रवाशांना वाचवले. पण, मसूदने २००० साली ‘जैश’ची स्थापना केली व तिच्यामार्फत काश्मीरमध्ये कारवाया सुरू केल्या. त्याच्या संघटनेने आतापर्यंत भारतात अनेक हल्ले केले आहेत.आजारी असल्याने मसूद जिहादी काऊन्सिलच्या (यूजेसी) गेल्या 6 बैठकांना हजर राहिला नव्हता. यूजेसी हे दहशवादी संघटनांची एक संघटना आहे जी भारताविरोधात कारवायांना पुरस्कृत करते. याच संघटनेचे संरक्षण पाकिस्तानद्वारा केले जाते. पुलवामा हल्ल्याच्या आधी 8 दिवस अझहरचे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होते. तेव्हा अझहरने त्यांच्यासाठी आजारी आवाजामध्ये संदेश ध्ननिमुद्रीत केला होता. 

ऑडिओ टेप मिळाली...या ऑडियो संदेशामध्ये भाचा उस्मान याच्या मृत्यूचा बदला घेण्यास अझहर दहशतवाद्यांना सांगत आहे. उस्मानला 2018 मध्ये सुरक्षादलांनी ठार केले होते. या हल्ल्यात मृत्यूपेक्षा जास्त चांगली बाब कोणतीच असू शकत नाही, असे अझहरने म्हटले आहे. 

काश्मीरात जैशचे अद्याप 60 दहशतवादीकाश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट जरी 100 टक्के केल्याचा दावा केला जात असला तरीही अद्याप जैश ए मोहम्मदचे 60 दहशतवादी लपलेले असल्याचे चौकशीत समोर आले आहे. हे दहशतवादी त्यांचे प्रमुख उमेर, इस्माईल आणि अब्दुल राशीद गाजी यांच्यासह लपलेले आहेत. यापैकी 35 जण पाकिस्तानातून घुसखोरी करून भारतात आलेले आहेत. 

टॅग्स :masood azharमसूद अजहरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर