शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाला रितसर परवानगी घ्या रवींद्र सेनगावकर : रस्त्यावर 25 टक्के पेक्षा जास्त मंडप न मारण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर :

सोलापूर :
गणेशोत्सव साजरा करत असताना संबंधित सार्वजनिक मंडळांनी रितसर सोलापूर महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अग्निशामक दल आणि पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यावर उभारण्यात येणारा मंडप हा 25 टक्के पेक्षा जास्त असू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त बालासिंग रजपूत, पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, सहायक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्त रवींद्र सेनगावकर म्हणाले की, गणेशोत्सव हा मोठा सण असून, सार्वजनिक मंडळांनी तो चांगल्या पद्धतीने साजरा करावा. उत्सवादरम्यान मंडपात दोन बेस व दोन स्पिकर लावण्यात यावे. लोकांना त्रास होईल असे डॉल्बी लावू नये, आवाज 75 डेसिबलच्यावर नसावा. वर्गणी गोळा करताना लोकांच्या खिशात हात घालू नका. मिरवणुकीत गुलालाचा जास्त वापर करू नका. मद्यप्राशन करून मिरवणुकीला गालबोट लावू नका. मंडळाच्या प्रत्येक पदाधिकार्‍याकडे ओळखपत्र असणे आवश्यक आहे. मोठय़ा मूर्ती न घेता छोट्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे सेनगावकर म्हणाले.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत असताना संबंधित मंडळांची धर्मादाय आयुक्त व पोलिसांकडे नोंद असली पाहिजे, अन्यथा बेकायदा मंडळ गृहीत धरले जाईल. रस्त्यावर थाटण्यात येणारा मंडप हा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 25 टक्केपेक्षा जास्त असता कामा नये. रितसर परवान्याला पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पूर्ण सहकार्य केले जाईल. उत्सवात फटाके फोडून शांततेचा भंग करू नये. गणपती विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य पाण्यात न टाकता ते कुंडीत टाकावे. यामुळे पाण्याचे प्रदूषण होणार नाही. पाण्यात विरघळतील अशा मूर्ती मंडळांनी घ्याव्यात, असे आवाहन यावेळी आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन सुनीता औसेकर यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी मानले. (प्रतिनिधी)
चौकट..
दहशतवादी कारवाईच्या धर्तीवर सतर्क राहा..
0 दहशतवादी कारवाईच्या धर्तीवर मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी सतर्क राहिले पाहिजे, अनोळखी व्यक्ती, वस्तू यावर लक्ष ठेवावे.
0 मंडळांमध्ये जुगार चालणार नाही याची काळजी घ्या अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील.
0 सिद्धेश्वर तलाव, कंबर तलाव व विहिरींचे पावित्र्य राखावे, निर्माल्य कुंडीत टाकून महापालिकेला सहकार्य करा.
0 आकडे टाकून वीज घेऊ नका, वीज वितरण कंपनीकडे मीटरची मागणी करा, कनेक्शन मिळून जाईल.
0 मशिदीच्या ठिकाणी गोंधळ न घालता शांततेत मिरवणूक काढावी, गुलालाचा जास्त वापर करू नये.
0 गणेशोत्सवदरम्यान बकरी ईद येत असून दोन्ही समाजाने एकमेकांच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये.
0 मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात व्हिडीओ कॅमेरे लावण्यात येणार असून अनुचित प्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल आदी कडक सूचनाही यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी केल्या. यावेळी अशोक मुळीक, राजन जाधव, सुनील रसाळे, नगरसेवक देवेंद्र भंडारे आदींनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या.

चौकट..
स्मार्ट सिटीचा संदेश द्या : काळम-पाटील
गणेशोत्सवादरम्यान मंडळांनी सजीव किंवा निर्जीव देखाव्यांमध्ये स्मार्ट सिटीचा संदेश देऊन जनजागृती करावी. मंडळाच्या ठिकाणी पेटी करून त्यामध्ये भाविकांकडून स्मार्ट सिटी संदर्भात सूचना करण्याचे आवाहन करावे. आपण शर्यत जिंकलो पण स्मार्ट सिटीचा टप्पा केव्हा मिळणार हे पाहावे लागणार आहे. उत्सव काळात मनपा मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आवाहन यावेळी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी केले.