शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘नरेंद्र मोदी गेले तर गुजरात जाईल’, बाळासाहेबांनी कधी केले होते नरेंद्र मोदींचे समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 13:37 IST

रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात बाळासाहेब मोदींना समर्थन देत आहेत.

मुंबई: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (1 डिसेंबर, गुरुवार) मतदान होत आहे. एकूण 182 पैकी 89 जागांसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, क्रिकेटर रवींद्र जडेजाने मतदानापूर्वी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह 'एका वाघाचे बोलणे ऐका, अजून वेळ आहे, गुजरातींनो समजून घ्या!' असे कॅप्शन जडेजाने व्हिडिओसोबत दिले.

व्हिडिओमध्ये नेमकं काय?रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा उत्तर जामनगरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. हा व्हिडिओ शेअर करत रवींद्र जडेजाने रिवाबाला म्हणजेच भाजपला मतदान देण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणातात की, 'जर नरेंद्र मोदी गेले, तर गुजरात गेले समजा.' बाळासाहेब ठाकरे कधी आणि कोणत्या पार्श्वभूमीवर हे बोलले होते, याची अनेकांना उत्सुकता आहे.  स्वतः उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या त्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली होती.

पहा बाळासाहेबांचा व्हिडिओ...

आता प्रश्न असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे हे कधी आणि का बोलले? उद्धव ठाकरे यांनी यावर्षी मे महिन्यात एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली होती. गुजरातमध्ये गोध्रा घटना घडली, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे बोलले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गुजरात जळत होता, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते.

त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना भाजपची मित्रपक्ष होती. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी सर्व बाजूंनी दबाव निर्माण केला जात होता. वाजपेयी यांनी मोदींना हटवण्याचा निर्णय घेतला होता. मित्रपक्ष म्हणून अडवाणींनी बाळासाहेबांना त्यांचे मत विचारले होते. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे लालकृष्ण अडवाणींना म्हणाले होते, 'नरेंद्र मोदी गेला तर गुजरात जाईल...' 

टॅग्स :ravindra jadejaरवींद्र जडेजाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022