शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला विधानसभेचे तिकिट दिल्याबद्दल रवींद्र जडेजाने मानले पंतप्रधान मोदींचे आभार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:38 IST

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भाजपाने जामनगर उत्तर मतदारसंघातून तिकिट दिले आहे. तीन वर्षांपूर्वी रिवाबा जडेजा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या रिवाबा मूळच्या गुजरातमधील राजकोट येथील आहेत.

मागील आठवड्यातील मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजपाच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीनंतर आता भाजपाने गुजरात निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जारी केली आहे. गुजरात भाजपाचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी उमेदवारांची घोषणा केली. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा यांनाही तिकीट देण्यात आले आहे. या जागेचे विद्यमान आमदार भाजपचे धर्मेंद्रसिंह जडेजा आहेत, मात्र पक्षाने रिवाबा यांच्यावर विश्वास दाखवला आहे. 

जडेजाने पत्नीला दिल्या शुभेच्छा पत्नीला विधानसभेचे तिकिट मिळताच रवींद्र जडेजाने एक ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. "विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे तिकीट मिळाल्याबद्दल माझ्या पत्नीचे अभिनंदन. तु केलेल्या सर्व प्रयत्नांचा आणि परिश्रमाचा अभिमान वाटतो. समाजाच्या विकासासाठी तु असेच काम करत राहा याच माझ्या तुला शुभेच्छा. मी आमचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि श्री अमित शाहजी यांचेही आभार मानू इच्छितो त्यांनी माझ्या पत्नीच्या क्षमतेवर विश्वास ठेवत उत्तम काम करण्याची संधी दिली." अशा शब्दांत जडेजाने मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांचे देखील आभार मानले आहेत. 

१ आणि ५ डिसेंबरला होणार निवडणुका गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. केंद्रीय निवडणूक समितीने गुजरात निवडणुकीसाठी पक्षाच्या १८२ उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपा अध्यक्ष सीआर पाटील, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ravindra jadejaरवींद्र जडेजाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहGujaratगुजरात