रवींद्र गायकवाडांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: April 7, 2017 16:37 IST2017-04-07T15:30:32+5:302017-04-07T16:37:55+5:30
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी एअर इंडियाने शुक्रवारी उठविली आहे.

रवींद्र गायकवाडांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 07 - शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदी एअर इंडियाने शुक्रवारी उठविली आहे.
दोन आठवड्यापूर्वी विमान प्रवासादरम्यान एअर इंडियाच्या कर्मचा-याला चप्पलेने मारहाण केल्याप्रकरणी एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर प्रवासबंदी घातली होती. या घटनेचे पडसाद संसदेत सुद्धा उमटले होते. अखेर एअर इंडियाने नमते घेत त्यांच्यावरील विमान प्रवासबंदी एअर इंडियाने हटविली आहे.
दरम्यान, रविंद्र गायकवाड यांनी गुरुवारी संसदेत झालेल्या गोंधळानंतर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपति राजू यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एअर इंडियाच्या विमानात झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. तसेच, एअर इंडियाकडून त्यांच्यावर घालण्यात आलेली विमान प्रवासबंदीही हटवण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतर जोपर्यंत रविंद्र गायकवाड विनाशर्त एअर इंडियाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यावरील निर्बंध कायम ठेवावेत, अशी मागणी ऑल इंडिया केबिन क्रू असोसिएशन (AICCA)ने केली होती. अखेर, एअर इंडियाने त्यांच्यावरील प्रवासबंदी मागे घेत त्यांचा विमान प्रवासाचा मार्ग मोकळा केला आहे.
#FLASH Air India lifts ban on Shiv Sena MP Ravindra Gaikwad pic.twitter.com/7V4nIjSUef
— ANI (@ANI_news) April 7, 2017
In view of apology tendered by Mr. Gaikwad & undertaking of good conduct given by him, AI & other airlines advised (by MoCA) to lift ban: AI
— ANI (@ANI_news) April 7, 2017
Jis ghatna ka anth accha hua to sab accha. Pyar se nahi hua to thoda sangharsh karna pada:Arvind Sawant,Shiv Sena on AI lifts ban on Gaikwad pic.twitter.com/WEmHQO61Pe
— ANI (@ANI_news) April 7, 2017