शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

अडीचशे वेळा तुरूंगवारी, तरीही ते नाहीत बाहुबली!, लढवय्या अशी रविदास मेहरोत्रांची ओळख

By shrimant mane | Updated: February 21, 2022 05:48 IST

लौकिकार्थाने ते बाहुबली नाहीत. त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्काही नाही. तरीदेखील तब्बल २५१ वेळा तुरूंगात जाण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

श्रीमंत माने

लखनऊ : लौकिकार्थाने ते बाहुबली नाहीत. त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्काही नाही. तरीदेखील तब्बल २५१ वेळा तुरूंगात जाण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लखनऊ सेंट्रल विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार, अखिलेश यादव मंत्रिमंडळातील माजी कॅबिनेटमंत्री रविदास मेहरोत्रा हे या अवलियाचे नाव. 

६६ वर्षांचे मेहरोत्रा तिसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश करण्यासाठी नशीब आजमावत आहेत. गेल्यावेळी  त्यांना पराभूत करणारे भाजपचे ब्रजेश पाठक आता अन्य मतदारसंघातून लढत आहेत. त्यामुळे मेहरोत्रा यांचा  विजय सोपा असल्याचे दिसते. या मतदारसंघात सर्वत्र त्यांची प्रतिमा लढवय्या, चळवळ्या नेता अशी आहे. अनोख्या विक्रमाबद्दल विचारले तर ते नुसतेच हसतात. यामुळेच मेहरोत्रा राजधानीत चर्चेचा मुद्दा बनले आहेत. 

मदतीसाठी तत्पर छोटे दुकानदार, फेरीवाले, रिक्षावाले असोत की अगदी महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटना असोत. न्याय मागण्यासाठी कुणी रस्त्यावर उतरलेले असेल, तर त्यांच्या मदतीला हमखास धावून जाणारा रविदास मेहरोत्रा नावाचा कार्यकर्ता नंतर १९८९ मध्ये दीड वर्षांसाठी व नंतर २०१२ मध्ये पुन्हा आमदार बनला, मंत्री झाला तरी सामान्यांच्या प्रश्नांवरील आंदोलने हा अजूनही त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. इतके गुन्हे, इतक्या वेळा तुरूंगवास यातून कधीकधी गमतीजमती घडतात. प्रत्यक्ष अपराधी नसतानाही या गुन्ह्यांमुळे पासपोर्ट मिळण्यात अडचणी आल्या. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी