शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी कारवाई! राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी प्रमुख रवी नारायण यांना ED ने केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 07:43 IST

Ravi Narain And ED : ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण (Ravi Narain) यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली आहे.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण (Ravi Narain) यांना अटक केली आहे. ईडीने यापूर्वी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना कथित फोन टॅपिंग प्रकरणात अटक केली होती.

कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग या दोन प्रकरणांचा सीबीआयकडून तपास सुरू होता. यामध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराचे (NSE) माजी प्रमुख रवी नारायण यांचा सहभाग आहे का? याचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येत होता. यानंतर अखेर ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) फौजदारी कलमांतर्गत फोन टॅपिंग प्रकरणात रवी नारायण यांना अटक केली आहे.

तीन वर्षे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या सीईओ असलेल्या चित्रा रामकृष्ण यांच्याबाबतचा हा खुलासा झाल्यानंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्याच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. चित्रा रामकृष्ण यांच्या ईमेलच्या तपासातून ही संपूर्ण घटना उघडकीस आली असून तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ईडीचे धाडसत्र; दिल्लीतील प्रकरणात पाच राज्यांमध्ये ४० ठिकाणांवर कारवाई

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततांशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीसह अन्य राज्यांतील ४० ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील ३८ ते ४० ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात येत आहे. ही ठिकाणे यात आरोपी असलेले काही सरकारी अधिकारी व खासगी व्यक्तीची आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, ही ठिकाणे मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित नाहीत, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय