वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावला
By Admin | Updated: December 27, 2014 18:54 IST2014-12-27T18:54:05+5:302014-12-27T18:54:05+5:30
नागपूर : वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इकराम ऊर्फ बच्चा (वय २०, रा. गरीब नवाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. यादवनगरातील अल्केश गौतम मेश्राम (वय २०) हा शुक्रवारी रात्री ८.३० वाजता कामावरून घरी परत जात होता. यशोधरानगरातील विटाभी चौकाजवळ त्याला आरोपी इकरामने रोखले. वस्तऱ्याचा धाक दाखवून इकराम अल्केशला लुटण्याचा प्रयत्न करू लागला. बचावासाठी आरडाओरड केली असता आरोपीने अल्केशला वस्तऱ्याने मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला. अल्केशने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून आरोपी इकरामला अटक केली.

वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावला
न गपूर : वस्तऱ्याने हल्ला करून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इकराम ऊर्फ बच्चा (वय २०, रा. गरीब नवाजनगर) असे आरोपीचे नाव आहे. यादवनगरातील अल्केश गौतम मेश्राम (वय २०) हा शुक्रवारी रात्री ८.३० वाजता कामावरून घरी परत जात होता. यशोधरानगरातील विटाभट्टी चौकाजवळ त्याला आरोपी इकरामने रोखले. वस्तऱ्याचा धाक दाखवून इकराम अल्केशला लुटण्याचा प्रयत्न करू लागला. बचावासाठी आरडाओरड केली असता आरोपीने अल्केशला वस्तऱ्याने मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळचा मोबाईल हिसकावून घेतला. अल्केशने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यशोधरानगर पोलिसांनी धावपळ करून आरोपी इकरामला अटक केली.-----