शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उंदरांनी फस्त केला तब्बल 60 लाखांचा गांजा, पोलिसांचा अजब दावा; न्यायाधीश म्हणाले, पुरावा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 13:49 IST

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्याअन्वये हा गांजा जप्त करण्यात आला होता.

मथुरा : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एक अजब घटना घडली आहे. जप्त केलेला व पोलिस ठाण्याच्या गोदामात ठेवलेला ५८६ किलो गांजा उंदरांनी फस्त केल्याचा अहवाल पोलिसांनीन्यायालयाला सादर केला आहे. या गांजाची किंमत ६० लाख रुपये आहे. पोलिसांच्या या अहवालाने न्यायाधीशही अचंबित झाले आहेत. गांजा उंदरांनीच फस्त केला याचे पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एनडीपीएस कायद्याअन्वये हा गांजा जप्त करण्यात आला होता. पोलिस ठाण्याच्या गोदामात गोणीत भरून ठेवलेला गांजा उंदरांनी खाऊन टाकला, असे पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सप्तम यांना सांगितले. त्यावर गांजा उंदरांनीच खाल्ला, याचे सबळ पुरावे उद्या, शनिवारी न्यायालयात सादर करा, असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे. 

उंदरांचा बंदोबस्त करण्याचा आदेश -- पोलिस ठाण्यात उंदरांनी उच्छाद मांडला असेल तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करा, असाही आदेश न्यायाधीश सप्तम यांनी पोलिसांना दिला. उंदीर किंवा आणखी कोणत्याही कारणांमुळे अमली पदार्थ प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा नष्ट होत असेल तर ते फारच गंभीर आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

- त्यावर जप्त केलेला गांजाचा सर्व साठा आता न्यायालयासमोर हजर करणे शक्य नाही. जो उरलासुरलेला गांजा आहे तो पुराव्यादाखल सादर करता येईल, असे सांगत पोलिसांनी न्यायालयासमोर हतबलता व्यक्त केली.

असा मारला उंदरांनी डल्ला -२०१८ साली दोन प्रकरणांत पोलिसांनी शेरगड व आणखी एका ठिकाणाहून गांजाचा मोठा साठा जप्त केला होता. मथुराच्या पोलिस ठाण्यातील गोदामामध्ये छतातून पाण्याची गळती होत असून, तिथे पावसाचे पाणी आत शिरते. त्यामुळे या गोदामात ठेवलेली गोणी भिजली. तेथील उंदरांनी ही गोणी कुरतडून त्यातील गांजा खाल्ला, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसCourtन्यायालय