शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

Fact Check : बापरे! 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर रेशन कार्ड होणार रद्द? जाणून घ्या "सत्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:11 IST

Ration Card Fact Check : रेशन कार्ड बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर असंख्य मेसेज हे सातत्याने व्हायरल होत असतात. अनेकदा त्यातील सर्वच मेसेज हे खरे असतात असं नाहीच तर काही मेसेज हे अफवा पसरवणारे, फेक असतात. अशावेळी असे खोटे मेसेज इतरांना पाठवण्याआधी त्याची सत्यता तपासणं अत्यंत गरजेचं आहे. असाच एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

रेशन कार्ड रद्द होणार याबाबत अधिक माहिती घेतली असता हा मेसेज खोटा असल्याची माहिती आता समोर आली आहे. रेशन कार्ड बातम्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. रेशन कार्डवर 3 महिने धान्य खरेदी केलं नाही तर कार्ड रद्द होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वी पसरली होती. ही बातमी निराधार असल्याचं सरकारने म्हटलं आहे. भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला असता सत्य समोर आलं आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. रेशन कार्डवर तीन महिने धान्य खरेदी केली नाही, तर ते रद्द करण्यात यावं अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे असा मेसज जोरदार व्हायरल झाला होता. मात्र केंद्र सरकारने राज्यांना अशी कोणतीही सूचना दिलेली नाही. हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी 1 सप्टेंबरपासून वीज बिल माफ होणार असे काही मेसेज सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होते. पण ते देखील खोटं होतं. 

सप्टेंबरपासून वीज बिल माफ केले जाईल असा दावा केला गेला. याबाबत अधिक चौकशी केली असता. त्याबाबतचं सत्य समोर आलं. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB) हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं होतं. फॅक्ट चेकमध्ये सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही असं सांगण्यात आलं. वीज बिलाची बातमी खोटी आहे. अशी कोणतीही योजना आणणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं. अशा खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याचा इशारा देखील पीआयबीने दिला आहे. त्यामुळे व्हायरल होण्याऱ्या खोट्या मेसेजवर लोकांनी विश्वास ठेवून नये.

टॅग्स :IndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल