शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
3
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
4
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
5
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
6
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
7
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
8
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
9
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
10
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
11
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
12
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
13
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
14
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
15
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
16
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
17
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
18
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
19
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
20
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?

Ration Card: देशातील 10 लाख लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार, मोफत धान्य मिळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 1:38 PM

Ration Card: देशभरात 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत रेशन मिळत आहे.

Free Ration card : सध्या देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. मात्र, आता सरकार लाखो लोकांचे रेशन बंद करणार आहे. जे लोक सरकारी रेशनचा खोट्या मार्गाने फायदा घेत आहेत, अशा देशभरातील 10 लाख बनावट शिधापत्रिका रद्द होणार आहेत. अशा बनावट मार्गाने धान्य घेणाऱ्या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. तसेच, ज्यांची शिधापत्रिका बनावट असेल, त्यांच्याकडून सरकार रेशन वसूल करेल.

देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोकही देशात आहेत. असे असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच, सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे. ज्यांना यापुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही.

अपात्र शिधापत्रिकाधारकांची यादी शिधावाटप विक्रेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेशन विक्रेते नावे चिन्हांकित करतील आणि अशा कार्डधारकांचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवतील. त्यानंतर त्यांची कार्डे रद्द केली जातील. जे लोक मोफत रेशन मिळण्यास पात्र आहेत त्यांनाच रेशन मिळेल.

या लोकांची ओळख पटली आहेNFSA नुसार जे कार्डधारक आयकर भरतात, याशिवाय ज्यांच्याकडे 10 बिघापेक्षा जास्त जमीन आहे. अशा लोकांची यादीही तयार केली जात आहे. त्याचबरोबर अशा लोकांचाही शिधापत्रिका रद्द करणाऱ्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी गेल्या 4 महिन्यात मोफत रेशन घेतलेले नाही. त्याचबरोबर काही लोक असे आहेत, जे मोफत रेशनचा व्यवसाय करतात. अशा लोकांचीही ओळख पटली आहे. बनावट मार्गाने शिधापत्रिका वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या यूपीमध्ये समोर आली आहे. मात्र, तरीही शिधापत्रिकाधारकांची पात्रता तपासण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार