रतन टाटांचे डोकं ठिकाणावर नाही - अमित मित्रा

By Admin | Updated: August 7, 2014 15:39 IST2014-08-07T15:25:06+5:302014-08-07T15:39:48+5:30

पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक विकास झाला नाही असे सांगणारे रतन टाटा यांचे डोकं ठिकाणावर नाही असे विधान पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित बित्रा यांनी केले आहे.

Ratan Tata's head is not in place - Amit Mitra | रतन टाटांचे डोकं ठिकाणावर नाही - अमित मित्रा

रतन टाटांचे डोकं ठिकाणावर नाही - अमित मित्रा

ऑनलाइन टीम

कोलकाता, दि. ७ - उद्योगपती रतन टाटा यांनी पश्चिम बंगालच्या विकासावरुन केलेली टीका सत्ताधारी तृणमूल पक्षाला चांगलीच झोंबली असून रतन टाटांचे डोक ठिकाणावर नाही असे विधान पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित बित्रा यांनी केले आहे. 
उद्योगपती रतन टाटा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर बुधवारी निशाणा साधला होता. पश्चिम बंगालमध्ये फिरताना मोठमोठ्या गृहप्रकल्पांचे बांधकाम सुरु असल्याचे दिसते. मात्र उद्योजक बंगालमध्ये येत नाही. त्यामुळे या राज्यात औद्योगिक विकास झाल्याचे दिसत नाही अशी टीका टाटा यांनी तृणूल सरकारवर केली होती. या टीकेला गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री अमित बत्रा यांनी रतन टाटा यांना प्रत्युत्तर दिले. मात्र या नादात त्यांची जीभ घसरली. रतन टाटा यांचे डोकं ठिकाणावर नाही असे विधान मित्रा यांनी केले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पश्चिम बंगालमधील औद्योगिक क्षेत्रात सुमारे २० हजार तरुणांना रोजगार देणार आहे. टाटा मेटालिक्सनेही गेल्या आठवड्यात आमच्याकडे विस्तारासाठी अर्ज केला आहे. अनिल अंबानीही आमच्या राज्यात गुंतवणूक करत आहे. या विषयी रतन टाटा यांना माहित नाही का ? असा सवाल मित्रा यांनी विचारला. 
 

Web Title: Ratan Tata's head is not in place - Amit Mitra