शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 23:23 IST

रतन टाटांनी ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे

मुंबई: नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातीलदहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या धाडसाचं टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी कौतुक केलं आहे. मंगळवारी मध्यरात्री हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठीमधील दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले. या कारवाईबद्दल रतन टाटांनी हवाई दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. या धाडसी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं टाटा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये मोदींच्या ट्विटर हँडलला टॅगदेखील केलं आहे. 'पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या यशस्वी एअर स्ट्राइकबद्दल आम्ही पंतप्रधान आणि भारतीय हवाई दलाचं अभिनंदन करतो. आमच्या जमिनीवर दहशतवाद्यांचे तळ नाहीत, असं पाकिस्तान कायम सांगायचा. संपूर्ण देशाला या कारवाईचा अभिमान वाटतो,' असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे. या ट्विटमध्ये टाटा यांनी मोदींच्या ट्विटर हँडलला टॅग केलं आहे. मोदींचे हे ट्विट 18 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर तब्बल 90 हजाराहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. भारतीय हवाई दलानं काल मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदचा मुख्य तळ असलेल्या बालाकोटवर हवाई दलानं बॉम्ब टाकले. याशिवाय मुझफ्फराबाद आणि चकोठीमधील दहशतवादी तळदेखील उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलानं जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब दहशतवादी तळांवर टाकले. 12 मिराज 2000 विमानांनी ही धाडसी कारवाई केली. विशेष म्हणजे अवघ्या 21 मिनिटांमध्ये भारतानं ही कारवाई फत्ते केली. यावेळी पाकिस्ताननं प्रतिकाराचा प्रयत्नदेखील झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलNarendra Modiनरेंद्र मोदीRatan Tataरतन टाटाPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी