'रतन' इतिहासातील सर्वात भ्रष्ट 'टाटा'
By Admin | Updated: November 3, 2016 17:03 IST2016-11-03T16:27:11+5:302016-11-03T17:03:43+5:30
रतन टाटा हे टाटा समूहाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट चेअरमन आहेत असा हल्लाबोल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. इतक्यावरच स्वामी थांबले नाहीत, त्यांनी

'रतन' इतिहासातील सर्वात भ्रष्ट 'टाटा'
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 3 - रतन टाटा हे टाटा समूहाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट चेअरमन आहेत असा हल्लाबोल भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. इतक्यावरच स्वामी थांबले नाहीत, त्यांनी 'रतन हे टाटा नसून त्यांच्या वडिलांनी त्यांना दत्तक घेतलं होतं' असा घणाघाती आरोप केला आहे.
तसेच रतन टाटा हे सायरस मिस्त्रींवर अन्याय करत आहेत. दोन महिन्यांपूर्वी सायरस मिस्त्रींच्या कामाचं सर्वांनी कौतूक केलं होतं, मिस्त्रींचं सर्वांनी कौतूक करणं हे टाटांना पचलं नसेल म्हणूनच त्यांना पदावरून काढण्यात आलं असं ते रायपुरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 2G घोटाळा, जॅग्यूअर विमानाच्या खरेदी प्रकरणातील घोटाळा तसेच एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस केलेले गैरव्यवहार आदी घोटाळ्यात टाटांचा सहभाग होता असा आरोपही त्यांनी केला.
यापुर्वीही सुब्रमण्यम स्वामी यांनी रतन टाटा यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली होती. एअर एशिया आणि विस्तारा विमानसेवेचे भागिदार बनतेवेळेस रतन टाटांनी भारतीय कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. सीबीआय, अंमलबजावणी संचलनालय आणि सेबीच्या अधिका-यांची टीम बनवून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. स्वामींनी मोदींना लिहिलेल्या पत्रात अनेक कलमांचा उल्लेख केला होता तसेच कलम 120 बी, 403, 405 आदी कलमांद्वारे कट रचणे, फसवणूक करणे आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर करणे असा खटला चालवावा अशी मागणी केली होती. जाता येऊ शकतो असं म्हटलं आहे.