राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30

आगर: येथील गुरुदेव मंडळाकडून ५ मे रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti Celebration | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी

र: येथील गुरुदेव मंडळाकडून ५ मे रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरुदेव मंडळाकडून आगर येथे तुकडोजी महाराज यांच्या जयंतीदिनी ३० एप्रिल रोजीच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते; परंतु गावातील व्यक्तीच्या निधनामुळे सदर कार्यक्रम रद्द करून ५ मे रोजी त्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी दारूचे व्यसन सोडणारे गावातील धर्मराज घुगरे, पंडित लंगोटे, प्रल्हाद श्रीनाथ, मोहन तायडे आदींचा गौरव क रण्यात आला. ऋषिपाल अनासने या बालकीर्तनकारासह रामपाल महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तनही यावेळी झाले. कार्यक्रमाला परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या चमूंची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन वासनकार, अक्षयपाल महाराज यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाच्या संचालकांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti Celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.