२४ व २५ तारखेला राष्ट्रपती भवन बंद
By Admin | Updated: May 24, 2014 04:27 IST2014-05-24T04:27:22+5:302014-05-24T04:27:22+5:30
देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या तयारीसाठी २४ व २५ मे रोजी राष्ट्रपती भवन बंद ठेवले जाणार आहे

२४ व २५ तारखेला राष्ट्रपती भवन बंद
नवी दिल्ली : देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण सोहळ्याच्या तयारीसाठी २४ व २५ मे रोजी राष्ट्रपती भवन बंद ठेवले जाणार आहे. मोदी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. राष्ट्रपती भवनातून प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनानुसार, शपथग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाकरिता दोन दिवस राष्ट्रपती भवन बंद राहील. यावेळी चेंज आॅफ गार्ड हा कार्यक्रमही घेतला जाणार नाही. या शपथग्रहण सोहळ्याला सार्क देशांचे राष्ट्राध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)