अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:10+5:302015-04-13T23:53:10+5:30
अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका
अ काळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका- सामान्यांत स्वाईन फ्लूनंतर मलेरियाची भीती - लहान मुले, गरोदर महिलांना धोका संभवण्याची शक्यता - नाले, गटारी, तलाव, सांडपाण्यात केली जातेय फवारणी औरंगाबाद, दि. १३ - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे सर्वदूर गारवा पसरला आहे. भर उन्हाळ्यात पाऊस कसा काय आला? या विचाराने सर्व नागरिक परेशान झाले आहेत. वातावरणाचा अंदाज येत नसून या पावसाने पिकांची नासधूस केली आहे. या पावसामुळे मलेरियाचा धोका मात्र संभवू शकतो. मलेरिया हा रोग प्लाज्मोडियम या जिवाणूमुळे पसरतो. हा जिवाणू एनाफिलीज मादी डासांमध्ये असतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा रोग झपाट्याने पसरतो. सर्वसामान्यांना मलेरियाचा काही त्रास होऊ नये म्हणून फवारणी सुरू करण्यात आली आहे. मुले व गर्भवतींना जास्त भीतीजगात दरवर्षी ४० ते ९० कोटी लोकांमध्ये ताप येण्याचे कारण मलेरिया आहे. यातील १० ते ३० लाख रुग्णांचा प्रतिवर्षी मृत्यू होतो. या आकडेवारीनुसार ३० सेकंदांत एक मृत्यू मलेरियामुळे होतो. यामध्ये पाच वर्षांची मुले आणि गरोदर महिलांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे या दोघांना जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घेणे जरूरी आहे. दुप्पट होईल मृत्यूदर१९९२ नंतर मलेरियाचे वाढते प्रमाण पाहता आतापर्यंत या प्रक्रियेत कसलीही कमतरता झाली नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या २० वर्षांत मलेरियामुळे होणार्या मृत्यूच्या दरांत दुपटीने वाढ झालेली असेल. बरेच रुग्ण हे ग्रामीण भागातून येतात. ते डॉक्टरकडे जात नाहीत किंवा त्यांना काय त्रास होतो आहे? हे लिहूनदेखील ठेवत नाहीत. त्यामुळे दुसर्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर त्यालाही काय करावे ते समजत नाही. (जोड आहे)