शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 08:45 IST

ओटीपोटाचा लठ्ठपणा, जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देताना आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम व हालचाल करण्याचा सल्लाही देण्यात आला.  

नवी दिल्ली : आपल्या वजनाबद्दल लोक आता बरेच जागरूक होऊ लागले आहेत. त्यातून मग वजन कमी करण्याकडे बहुतेकांचा कल आहे. परंतु जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने वजन कमी करण्याचा सल्ला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) लोकांना दिला आहे. तसेच लठ्ठपणाविरोधी औषधे न घेण्याचे आवाहनही केले आहे.

ओटीपोटाचा लठ्ठपणा, जास्त वजन आणि एकूणच लठ्ठपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला देताना आयसीएमआरने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. वजन कमी करण्यासाठी पोषक आहारासह नियमित व्यायाम व हालचाल करण्याचा सल्लाही देण्यात आला.  

आशियाई मानकानुसार २३ ते २७.५ किलोपर्यंतचा बीएमआय असल्यास वजन जास्त म्हणून धरले जाते. बीएमआय म्हणजे व्यक्तीचे किलोग्रॅममधील वजन भागिले व्यक्तीची मीटरमध्ये उंची. त्यानुसार भारतात ३० टक्के शहरी आणि १६ टक्के ग्रामीण प्रौढांचे वजन जास्त आहे.

१००० किलो कॅलरीपेक्षा कमी नको...वजन हळूहळू कमी करायला हवे. या काळातील आहार १००० किलोकॅलरी प्रतिदिनपेक्षा कमी नसावा आणि सर्व पोषकतत्त्वे पुरवणारा हवा. दर आठवड्याला अर्धा किलो वजन कमी करणे सुरक्षित मानले जाते, असे आयसीएमआरने म्हटले आहे.

वजन कमी करण्यासाठी हे करा...- पुरेशा भाज्यांसह संतुलित जेवण : उच्च फायबर व पोषकतत्त्वे असलेले जेवण जास्त प्रमाणात खाण्याची इच्छा व अतिरिक्त कॅलरीजची गरज कमी करेल.- आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा : कमी कॅलरी आणि जास्त जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असलेल्या भाज्या वजन कमी करण्यास मदत करतील.- स्नॅक स्मार्ट : मूठभर काजू, साधे दही, मसाल्यासह कापलेल्या भाज्या यांसारखे पोषक-पर्याय निवडा.- निरोगी स्वयंपाक पद्धती : ग्रीलिंग, बेकिंग, वाफाळणे किंवा भाजण्यासाठी तळण्याच्या तुलनेत कमी तेल लागते. यामुळे जेवणातील ऊर्जा घनता कमी होते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य