नवी दिल्ली : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री ज़े जयललिता यांच्याविरोधात श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रलयाच्या संकेतस्थळावरील आक्षेपार्ह लेख आणि छायाचित्रवर भारताने आज सोमवारी तीव्र आक्षेप नोंदवला़ संसदेच्या दोन्ही सभागृहात याचे पडसाद उमटल़े या लेखाच्याविरोधात अण्णाद्रमुकच्या सदस्यांनी संसदेत जोरदार गोंधळ घातला़ या गदारोळात, सरकारने संबंधित लेखाची तीव्र निंदा करीत, याबाबत श्रीलंकन उच्चायुक्ताला जाब विचारला जाईल, असे स्पष्ट केल़े
अण्णाद्रमुक सदस्यांच्या गोंधळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागल़े वरिष्ठ सभागृहात प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही़ परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दोन्ही सभागृहात जारी स्पष्टीकरणात श्रीलंकन संकेस्थळावरील आक्षेपार्ह लेखाची कठोर शब्दांत निंदा केली़ सरकार श्रीलंकन उच्चायुक्तांना पाचारण करून सभागृह आणि सरकारच्या भावना त्यांच्यार्पयत पोहोचवल्या जातील़ ही अतिशय गंभीर बाब असून भारत अशा कृत्याची तीव्र शब्दांत निंदा करतो, असे त्या म्हणाल्या़
लोकसभेत अण्णाद्रमुक नेता एम़ थंबीदुरई यांनी या आक्षेपार्ह लेखाचा मुद्दा उपस्थित केला़ जयललितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकन नौदलाकडून तामिळ मच्छिमारांना होत असलेल्या त्रसाबाबत अनेक पत्रे लिहिली आहेत़ या पत्रंना कथितरीत्या ‘प्रेमपत्र’ संबोधणो अपमानास्पद आहे, असे ते म्हणाल़े त्यांनी या लेखासंदर्भात सर्वसहमतीने निंदा प्रस्ताव आणण्याची मागणी केली़ अण्णाद्रमुक सदस्यांनी गोंधळ घालत हा मुद्दा लावून धरला़ यामुळे लोकसभेचे कामकाज दोनदा स्थगित करावे लागल़े
राज्यसभेतही अण्णाद्रमुक सदस्य व्ही़ मैत्रेयन यांनी हा मुद्दा लावून धरला़ यामुळे राज्यसभेचे कामकाजही दोनदा स्थगित करावे लागल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
4श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रलयाच्या संकेतस्थळावर ‘जयललितांनी मोदींना लिहिलेली पत्रे किती आशयपूर्ण?’ या शीर्षकाखाली एक लेख लिहिला आह़े या लेखात जयललितांबाबत असभ्य शब्दांत टीका करण्यात आली आह़े या लेखात जयललिता आणि मोदी यांच्यासंदर्भातील तितकेच आक्षेपार्ह छायाचित्रही आह़े
4या लेखावरून तामिळनाडूत श्रीलंकेविरुद्ध तीव्र निषेध व्यक्त होऊ लागताच श्रीलंकेने संबंधित संकेतस्थळावरील हा लेख काढून घेतला़ मात्र याउपरही तामिळनाडूत याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त होत आह़े
4चेन्नई: श्रीलंकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरोधातील अपमानास्पद लेखावर तामिळ चित्रपटसृष्टीनेही आपला निषेध नोंदवला़ तामिळ सिनेसृष्टीतील अनेक सदस्यांनी सोमवारी लंगंमबक्कमस्थित श्रीलंकेच्या उपउच्चायुक्त कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
4तामिळ अभिनेता सूर्या, त्याचे वडील व ज्येष्ठ अभिनेते शिवकुमार, दिग्दर्शक मानोबाला आदींनी या निदर्शनात भाग घेतला़ यामुळे अनेक तामिळ चित्रपटांचे शूटींगही रद्द करण्यात आल़े