स्लीपर बर्थ देण्याच्या बहाण्याने धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेवर बलात्कार
By Admin | Updated: June 13, 2017 17:45 IST2017-06-13T17:45:23+5:302017-06-13T17:45:23+5:30
जयपूर ते वांद्रे या एक्स्प्रेसमध्ये एका महिलेवर स्लीपर बर्थ देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना

स्लीपर बर्थ देण्याच्या बहाण्याने धावत्या एक्स्प्रेसमध्ये महिलेवर बलात्कार
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 13 - जयपूर ते वांद्रे या एक्स्प्रेसमध्ये एका महिलेवर स्लीपर बर्थ देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
जयपूर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 12 जून रोजी आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यानंतर हे प्रकरण सूरत रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
9 जून रोजी जयपूर-वांद्रे एक्स्प्रेसमधून प्रवास करत असताना एका इसमाने स्लीपर बर्थ देतो, असं सांगितलं. त्यानंतर पँट्री कारमध्ये नेऊन तिथे बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेने ट्विटरवरून दिली आहे. पण या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे.