जग अस्तित्वात असेपर्यंत बलात्कार होतच राहतील - दीपक हलदार

By Admin | Updated: August 29, 2014 02:21 IST2014-08-29T02:21:42+5:302014-08-29T02:21:42+5:30

जगात याआधीही बलात्कार होत होते, आजही होत आहेत व जग अस्तित्वात असेपर्यंत ते होतच राहतील, असे बेछूट व वादग्रस्त विधान करून तृणमूलच्या दीपक हलदार या आमदाराने आपली अक्कल पाजळली आहे

Rape will continue until the world exists - Deepak Halder | जग अस्तित्वात असेपर्यंत बलात्कार होतच राहतील - दीपक हलदार

जग अस्तित्वात असेपर्यंत बलात्कार होतच राहतील - दीपक हलदार

कोलकाता : जगात याआधीही बलात्कार होत होते, आजही होत आहेत व जग अस्तित्वात असेपर्यंत ते होतच राहतील, असे बेछूट व वादग्रस्त विधान करून तृणमूलच्या दीपक हलदार या आमदाराने आपली अक्कल पाजळली आहे व विरोधी पक्ष आणि महिला हक्क संघटनांना टीकेची झोड उठवायला एक नवे खाद्य मिळवून दिले आहे.
येथील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात डायमंड हार्बर येथे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. त्यात त्यांनी बलात्कार हा एक सामाजिक आजार असून, आपण त्याचे समर्थन करीत नाही असे म्हटले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकट्याने हा प्रश्न सोडवता येणार नाही, असेही त्यांनी पुढे नमूद केले.
(वृत्तसंस्था)

 

Web Title: Rape will continue until the world exists - Deepak Halder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.