बुलंदशहरात मायलेकीवर झालेला बलात्कार हे राजकीय कारस्थान - आझम खान
By Admin | Updated: August 2, 2016 13:52 IST2016-08-02T13:42:39+5:302016-08-02T13:52:23+5:30
राष्ट्रीय महामार्गावर मायलेकीवर झालेला बलात्कार हे विरोधकांनी रचलेले कारस्थान आहे असे गंभीर असंवेदनशील वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केले आहे.

बुलंदशहरात मायलेकीवर झालेला बलात्कार हे राजकीय कारस्थान - आझम खान
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २ - बुलंदशहरात राष्ट्रीय महामार्गावर मायलेकीवर झालेला बलात्कार हे विरोधकांनी रचलेले कारस्थान असू शकते असे गंभीर असंवेदनशील वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी केले आहे. आझम खान यांची वादग्रस्त विधान करण्याची ही पहिली वेळ नाही.
उत्तरप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधक कुठल्याही पातळीला पोहोचतील असे आझम खान यांनी म्हटले आहे. आझम खान यांच्या वक्तव्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केला आहे.
या संपूर्ण प्रकरणामध्ये विरोधकांचा हात आहे का ? याचा तपास झाला पाहिजे. ज्यांना सत्तेत यायचे आहे ते राजकीय फायद्यासाठी इतकी खालची पातळी गाठू शकतात असे आझम खान यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री दिल्ली-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर बुलंद शहर येथे दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लुटून महिलेवर आणि तिच्या मुलीवर बलात्कार केला. नोएडा सेक्टर ६८ मध्ये रहाणार हे कुटुंब एक नातेवाईकाच्या तेराव्याच्या विधीसाठी शहाजहानपूर येथे चालले असताना ही घटना घडली.