मेल्याचे भासवून बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका

By Admin | Updated: June 2, 2016 02:58 IST2016-06-02T02:58:08+5:302016-06-02T02:58:08+5:30

एका अल्पवयीन मुलीने स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून बलात्काराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. मुलगी दिल्लीच्या किरारी भागामध्ये रहाते.

The rape survivor was found dead | मेल्याचे भासवून बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका

मेल्याचे भासवून बलात्काऱ्याच्या तावडीतून सुटका

नवी दिल्ली : एका अल्पवयीन मुलीने स्वत:चा मृत्यू झाल्याचे भासवून बलात्काराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. मुलगी दिल्लीच्या किरारी भागामध्ये रहाते. शुक्र वारी मध्यरात्री आरोपीने ती घराबाहेर कॉटवर झोपलेली असताना तिचे अपहरण केले. जाग येताच आपण अनोळखी ठिकाणी असल्याचे तिच्या लक्षात आले. आरडाओरडा करताना आरोपीने तिचे तोंड दाबले. तिला निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केला. आरोपी ठार मारेल या भितीने ती निपचित पडून राहिली. मुलगी मरण पावली असे समजून आरोपी निघताच मुलगी घराच्या दिशेने धावत सुटली. ते पाहून आरोपीने तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने घरी पोहोचून घडला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: The rape survivor was found dead