चिमुरडीवर शाळेतच बलात्कार

By Admin | Updated: July 18, 2014 02:44 IST2014-07-18T02:44:28+5:302014-07-18T02:44:28+5:30

कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विकृत लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी गुरुवारी अवघा देश हादरला.

Rape in school at Chimurdi | चिमुरडीवर शाळेतच बलात्कार

चिमुरडीवर शाळेतच बलात्कार

नवी दिल्ली : कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विकृत लैंगिक अत्याचाराच्या घटनांनी गुरुवारी अवघा देश हादरला. गेल्या २४ तासांत देशाच्या अनेक भागात महिलांवर हृदय पिळवटून काढणारे अत्याचार झाले आहेत. अशा १० गुन्ह्यांपैकी चार उत्तर प्रदेशातील आहेत. तर कर्नाटकच्या राजधानीत शाळेच्याच वेळेत पहिल्या इयत्तेतील सहा वर्षांच्या चिमुरडीवर वर्गातच बलात्कार झाला. त्यानंतर शाळेबाहेर जमलेल्या संतप्त पालकांचे आंदोलन कमालीचे उग्र झाले.
विद्येचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळादेखील आता मुलींसाठी सुरक्षीत नाहीत का, असा प्रश्न पडण्याजोगी घटना बंगळुरु तील व्हिबग्योर इंटरनॅशनल शाळेत घडली. सहा वर्षीय बालिकेवर शाळेच्याच दोन कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची तक्र ार पालकांनी केली आहे. शाळा दोषींवर कारवाई करीत नसल्याचा पालकांचा आरोप आहे. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून जिम प्रशिक्षक व सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शाळा जोवर या घटनेची जबाबदारी स्वीकारत नाही, तोवर आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार पालकांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात गुरु वारी मुरादाबादमध्ये एका मुलीची हत्या करून मृतदेह झाडाला लटकावण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Rape in school at Chimurdi