'सैराट' सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार
By Admin | Updated: August 22, 2016 12:08 IST2016-08-22T10:43:26+5:302016-08-22T12:08:43+5:30
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात ‘सैराट’ चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

'सैराट' सिनेमा दाखवण्याच्या बहाण्याने बलात्कार
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठात तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल केला आहे. ‘सैराट’ चित्रपट दाखवण्याच्या बहाण्याने आपल्यावर बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
पीडित तरुणी जेएनयूमध्ये पीएचडीच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. 'आपल्याला सैराट चित्रपट पाहायचा होता, त्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटवर आपण अनेकांकडे या चित्रपटाबद्दल चौकशी केली होती. अनमोलने आपल्याकडे हा चित्रपट आहे, हवा असेल तर हॉस्टेल रुमवर येऊन घेऊन जा असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने मेसेज करुन पेन ड्राईव्हमधून चित्रपटाची कॉपी घेऊन जाण्यास सांगितलं. त्याच्यासोबत हॉस्टेल रुममध्ये गेल्यावर त्याने पेयातून गुंगीच औषध देऊन बलात्कार केला', अशी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे.
पोलिसांनी आरोपी अनमोलवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अनमोल हा ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनचा कार्यकर्ता आहे. मात्र बलात्काराच्या आरोपांनंतर त्याला असोसिएशनमधून काढून टाकण्यात आलं आहे.