शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मदरशातील बलात्कार प्रकरण: सीसीटीव्हीत दिसले मुलगा-मुलगी, मौलवीच्या भूमिकेवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 10:10 IST

साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे.

उत्तर प्रदेश- साहिबाबादमधल्या एका मदरशामधल्या मुलीवरील बलात्कार प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचची टीम चौकशी करतेय. या मदरशातील बलात्कार प्रकरणात मौलानाच्या शिवाय एक अल्पवयीन मुलगा आरोपी आहे. दिल्ली पोलिसांची टीम बुधवारी मदरशामध्ये दाखल झाली आणि तिथे जाऊन काही विद्यार्थ्यांची चौकशी केली. काही स्थानिक लोकांनाही विचारणा करण्यात आली. या मदरशातून पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आलं आहे. अपहरण करून मदरशात ओलीस ठेवून माझ्यावर बलात्कार करण्यात आला, अशी माहिती पीडितेनं दिली.दिल्ली पोलीस आता या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहे. पोलिसांच्या चौकशीत सीसीटीव्ही फुटेजच्या प्रमुख पुरावे सापडले आहेत. गाझियाबादेतल्या हिडन विहार कॉलनीमधून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अल्पवयीन मुलगा पीडित मुलीबरोबर दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीडित मुलगी एक टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पाहायला मिळते. तसेच त्या मुलानं शर्ट आणि ट्राऊजर घातलं होतं. मुलगी अचानक त्या मुलाच्या मागून जाताना दिसते आहे. त्याच्या काही वेळानंतर ती सीसीटीव्हीतून गायब झाली. तर मदरशाजवळ राहणा-या काही व्यक्तींनी या दोघांना मदरशात जाताना पाहिलं.मदरशातील मुलाच्या मित्रांना या प्रकाराची माहिती होती आणि त्यांनी मुलीला लपवण्यासाठी त्याची मदत केल्याचाही पोलिसांना संशय आहे. तर ज्या मौलवीच्या खोलीत मुलीला ओलीस ठेवून बलात्कार करण्यात आला होता, त्या मौलवीनं स्वतः निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलिसांनीही अद्याप मौलवीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवलेला नाही. या घटनेवेळी मी मदरशात नव्हतो, असा दावा त्या मौलवीनं केला आहे. पोलीस मौलवीच्या त्या दाव्याची सत्यता पडताळते आहे. मौलवीशिवाय आरोपी विद्यार्थ्याचे कॉल रेकॉर्ड्सही तपासण्यात येत आहेत. पोलिसांनी या प्रकरणात 17 वर्षीय तरुणाला आरोपी बनवलं आहे. त्याच्यावर अपहरण आणि पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग