शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादमध्ये आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, महिला आयोगाचे डीजीपींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:59 IST

Rape in Hyderabad: हैदराबादमध्ये नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण अद्याप शांत झाले नव्हते, त्यात काल आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

Rape in Hyderabad: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये नुकतेच घडलेले अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्काराचे प्रकरण अद्याप शांत झाले नव्हते, त्यात काल आणखी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पहिली गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर आमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे.

रामगोपालपेट इन्स्पेक्टर सैदुलू म्हणाले, “आम्हाला बाल कल्याण समितीकडून तक्रार मिळाली की, 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर 23 वर्षीय तरुणाने आमीष दाखवून बलात्कार केला. पॉक्सो कायदा आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.''

तर, राजेंद्रनगर सर्कलचे इन्स्पेक्टर कनकैया म्हणाले, "आम्हाला एका अल्पवयीन मुलीकडून तक्रार मिळाली होती की, एका महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाने थिएटरमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अल्पवयीन मुलाला निरीक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.

मुलांचे संरक्षण करण्यात पोलीस अपयशी हैदराबादमधील बलात्काराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या, हैदराबादमधील घटना दुःखद आहे. अल्पवयीन मुलांना सुरक्षा देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणाची दखल घेत मी तेलंगणा डीजीपींना पत्र लिहिले होते. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात 4 आरोपींना अटक केली असून एक फरार आहे. एनसीडब्ल्यू इतर बाबींचीही दखल घेईल.

तेलंगणा राज्य महिला आयोगानेही राज्याचे पोलीस महासंचालक एम महेंद्र रेड्डी यांना एका किशोरवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून याप्रकरणी अहवाल मागवला असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाCrime Newsगुन्हेगारीhyderabad-pcहैदराबाद