ननवरील बलात्कार; आठ जण ताब्यात
By Admin | Updated: March 15, 2015 23:20 IST2015-03-15T23:20:33+5:302015-03-15T23:20:33+5:30
नादिया जिल्ह्यातील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ७१ वर्षांच्या ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी रविवारी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.

ननवरील बलात्कार; आठ जण ताब्यात
कृष्णानगर/कोलकाता : नादिया जिल्ह्यातील एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये ७१ वर्षांच्या ननवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी रविवारी आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
नादियाचे पोलीस अधीक्षक अर्णब घोष यांनी ही माहिती दिली. या आठही लोकांची चौकशी सुरू असून, जिल्ह्यात शोधमोहीम आरंभली असल्याचे त्यांनी सांगितले. जीजस अॅण्ड मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या सिस्टर सुपेरियरवर येथील राणाघाट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम बंगालचे राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.