अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार

By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:22+5:302015-02-06T22:35:22+5:30

बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्‘ातील फरीदपूर येथे शनिवारी शाळेला जात असलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीचे वाटेत अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

Rape in a moving car at a minor girl | अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार

अल्पवयीन मुलीवर धावत्या कारमध्ये बलात्कार

ेली : उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील फरीदपूर येथे शनिवारी शाळेला जात असलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीचे वाटेत अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
गुरुवारी पीडित मुलगी शाळेत जात असताना एसयुव्ही कारमधून आलेल्या चार जणांनी तिचे अपहरण केले आणि नंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही या नराधमांनी मुलीला दिली. कुकर्म केल्यानंतर नराधमांनी मुलीला निर्जन स्थळी सोडून दिले. पीडित मुलीने घरी परतल्यानंतर आपल्या पालकांना आपबिती सांगितली. पोलिसांनी या चारही नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चारपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीत या मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक लोकांनी तीव्र निदर्शने केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात विलंब केल्याचा आरोप करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Rape in a moving car at a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.