बंगळुरूत १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

By Admin | Updated: November 6, 2015 12:36 IST2015-11-06T12:36:11+5:302015-11-06T12:36:44+5:30

. ग्रामीण बंगळुरूत एका १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याने संपूर्ण देशाला हारवणा-या 'निर्भया' बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे.

Rape in a moving bus on an 18-year-old girl in Bangalore | बंगळुरूत १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

बंगळुरूत १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार

>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. ६ - कॉल सेंटरमध्ये काम करणा-या एका २३ वर्षीय तरूणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बंगळुरू पुन्हा बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. ग्रामीण बंगळुरूत एका १८ वर्षीय तरूणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याने संपूर्ण देशाला हारवणा-या 'निर्भया' बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. 
ग्रामीण बंगळुरूतूल होस्कोट येथे एका १८ वर्षीय तरूणीवर मिनी-बसच्या ड्रायव्हरने बलात्कार केला आहे. काल संध्याकाळच्या सुमारास पीडित तरूणी मिनी-बसमध्ये चढली, ती एकटीच असल्याचे पाहून बस ड्रायव्हरने कंडक्टरला बस चालवण्या सांगितले आणि त्या तरूणीवर अत्याचार केला.
याप्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरसह कंडक्टरलाही अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Rape in a moving bus on an 18-year-old girl in Bangalore