अल्पवयीन मुलीला पळविणार्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा
By Admin | Updated: April 18, 2016 00:47 IST2016-04-18T00:47:20+5:302016-04-18T00:47:20+5:30
जळगाव: जाखनी नगर कंजरवाडा भागातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. रविवारी पीडित मुलगीने दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल बिर्जु सहाने याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून विशालने पळवून नेले व सुरतला बलात्कार केला,अशी फिर्याद मुलीने दिली. दरम्यान, रविवारीही याच प्रकरणावरुन दोन्हीकडील नातेवाईकांनी दिवसभर एमआयडीसी पोलीस स्टेशला गोंधळ घातला. शनिवारीही हा वाद सुरु होता. विशाल व त्याचा भाऊ पवन बिर्जू सहाने यांच्यावर यापुर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशालला अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी यांनी दिली.

अल्पवयीन मुलीला पळविणार्या तरुणावर बलात्काराचा गुन्हा
ज गाव: जाखनी नगर कंजरवाडा भागातील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. रविवारी पीडित मुलगीने दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल बिर्जु सहाने याच्याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे आमिष दाखवून विशालने पळवून नेले व सुरतला बलात्कार केला,अशी फिर्याद मुलीने दिली. दरम्यान, रविवारीही याच प्रकरणावरुन दोन्हीकडील नातेवाईकांनी दिवसभर एमआयडीसी पोलीस स्टेशला गोंधळ घातला. शनिवारीही हा वाद सुरु होता. विशाल व त्याचा भाऊ पवन बिर्जू सहाने यांच्यावर यापुर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशालला अटक करण्यात आल्याची माहिती तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी यांनी दिली.