शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर त्यानं तिला पेटवलं, पण तोच कर्माने मेला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:40 IST

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आगीत होरपळून पीडित महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

मालदा - पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार पीडित महिलेने जळत असताना मिठी मारल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मालदा जिल्ह्यामध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरी एकटीच असताना एक तरुण तिच्या घरात घुसला. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला पेटवून दिलं. 

तरुणाने महिलेला पेटवून दिल्यानंतर महिलेने आरोपी तरुणालाच मिठी मारली. घरातून धूर येत असल्याचे दिसताच शेजाऱ्यांनी महिलेच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी शेजाऱ्यांना दोन व्यक्ती जळत असलेल्या दिसल्या. त्यांनी त्वरीत या घटनेची पोलिसांना माहिती दिली. दोघांना उपचारासाठी जवळच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये आरोपी तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीत होरपळून पीडित महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पोलिसांना पीडित महिलेच्या घरात रॉकेल सापडलं आहे. महिलेने तरुण आपल्याला सातत्याने त्रास देत होता अशी तक्रार केली आहे. तर शेजाऱ्यांनी हा तरुण वारंवार पीडित महिलेच्या घरी येत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पीडित महिलेच्या घरापासून आरोपीचं घर हे 35 किलोमीटर दूर असताना तो का आला होता याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRapeबलात्कारDeathमृत्यूPoliceपोलिस