भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार
By Admin | Updated: July 28, 2014 09:34 IST2014-07-28T09:18:07+5:302014-07-28T09:34:53+5:30
भारतात दर अर्धा तासाला एक बलात्काराची घटना घडत असून गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.

भारतात दर अर्धा तासाला एक बलात्कार
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २८- भारतात दर अर्धा तासाला एक बलात्काराची घटना घडते अशी लाजीरवाणी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या १३ वर्षात भारतात तब्बल २ लाख ७२ हजार ८४४ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले असून २००१ च्या तुलनेत २०१३ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल ५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कॉमनवेल्थ ह्यूमन राईट्स इनिशिएटीव्ह (सीएचआरआय) तर्फे भारतातील २००१ ते २०१३ या कालावधीतील बलात्काराच्या घटनांवर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. भारतातील २८ राज्यांमध्ये या १३ वर्षात २ लाख ६४ हजार १३० बलात्काराच्या घटना घडल्या. यानुसार या राज्यांमध्ये दिवसाला सरासरी ५६ बलात्काराच्या घटना घडतात असे अहवालात म्हटले आहे. तर देशातील सात केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिवसाला दोन बलात्काराच्या घटना घडतात. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत तब्बल ८ हजार ०६० बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातही बलात्काराचे प्रमाण वाढल्याचे या अहवालात म्हटले आहेत. महाराष्ट्रात २००१ मध्ये १,३०२ बलात्काराचे गुन्हे दाखल होते. तर २०१३ मध्ये हेच प्रमाम थेट ३,०६३ पर्यंत पोहोचले. म्हणजेच राज्यात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल १३५ टक्क्यांनी वाढ झाली.