दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला अटक
By Admin | Updated: July 5, 2016 17:54 IST2016-07-05T17:54:58+5:302016-07-05T17:54:58+5:30
दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधम पित्याला चेन्नई पोलिसांनी रविवारी अटक केली.

दत्तक घेतलेल्या मुलीवर बलात्कार करणा-या पित्याला अटक
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ५ - दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या नराधम पित्याला चेन्नई पोलिसांनी रविवारी अटक केली. चेन्नईतील तोंदीयारपेठमध्ये ही घटना घडली. ही पिडित मुलगी पित्यापासून गर्भवती होती. आरएसआरएम या सरकारी रुग्णालयात मुलीची प्रसूती झाली. तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पित्याला अटक झाली.
पंधरावर्षांपूर्वी मनी आणि त्याच्या पत्नीने जवळच्या नातेवाईकाकडून ही मुलगी दत्तक घेतली होती. नातेवाईकाची परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांनी या मुलीला दत्तक घेतले होते. मनी ५४ वर्षांचा असून, त्याने अनेकदा आपल्याच दत्तक मुलीवर बलात्कार केला. त्यातून या मुलीला दिवस गेले.
आपण अडचणीत येऊ नये यासाठी त्याने मुलीला घरात डांबून ठेवले होते. मनीच्या पत्नीलाही या घटनेची माहिती असावी पण कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी तिने ही माहिती लपवून ठेवली असा पोलिसांना संशय आहे. मनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.