अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार
By Admin | Updated: February 7, 2015 02:32 IST2015-02-07T02:32:41+5:302015-02-07T02:32:41+5:30
शाळेला जात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीचे वाटेत अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.

अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार
बरेली : उत्तर प्रदेशच्या (युपी) बरेली जिल्ह्यातील फरीदपूर येथे शनिवारी शाळेला जात असलेल्या १४ वर्षांच्या मुलीचे वाटेत अपहरण करून तिच्यावर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
गुरुवारी पीडित मुलगी शाळेत जात असताना एसयूव्ही कारमधून आलेल्या चार जणांनी तिचे अपहरण केले आणि नंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही या नराधमांनी मुलीला दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय तपासणीत या मुलीवर बलात्कार झाल्याची पुष्टी झाली आहे. (वृत्तसंस्था)