बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार
By Admin | Updated: February 1, 2016 14:38 IST2016-02-01T14:38:10+5:302016-02-01T14:38:10+5:30
बलात्काराच्या यातना सोसलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीवर पुन्हा रुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे.

बलात्कार पीडितेवर रुग्णालयात पुन्हा बलात्कार
ऑनलाइन लोकमत
जमशेदपूर, दि. १ - बलात्काराच्या यातना सोसलेल्या अल्पवयीन पीडित तरुणीवर पुन्हा रुग्णालयात बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना जमशेदपूरमध्ये घडली आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिला उपचारासाठी जमशेदपूरच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तिथे डयुटीवर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने पुन्हा या तरुणीवर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी फरार झाला आहे.
मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खासगी सुरक्षा रक्षकाला पकडण्यासाठी तपास सुरु केला आहे. मुख्यमंत्री रघुबर दास यांनी एमजीएम रुग्णालयाची पाहणी करुन गेल्यानंतर काही तासांनी ही घटना घडली.