पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:39+5:302015-12-13T00:07:39+5:30

पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

Rape Against PSI | पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पीएसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

एसआयविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल : लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार
नागपूर : ग्रामीण पोलिसातील एक उपनिरीक्षका(पीएसआय)विरुद्ध हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद लक्ष्मण मांढरे (३३) असे आरोपीचे नाव आहे.
सूत्रानुसार विनोद पूर्वी शहर पोलिसात शिपाई होता. तो मूळचा भंडारा येथील रहिवासी आहे. पीडित २३ वर्षीय विद्यार्थिनीसुद्धा भंडाऱ्यातीलच आहे. ती सध्या हुडकेश्वर परिसरात राहते. दोघांमध्ये जून २००५ पासून ओळख आहे.
विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार विनोदने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान त्याची पीएसआय म्हणून निवड झाली. त्याला कामठी ठाण्यात पोस्टिंग मिळाली. मांढरेने जून २०१५ पर्यंत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीएसआय म्हणून निवड झाल्यानंतर त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न केले. पीडित विद्यार्थिनीला त्याने लग्नासाठी नकार दिला. पीडित विद्यार्थिनी शुक्रवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचली. पीएसआयच्या विरुद्ध तक्रार असल्याने पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. अधिवेशन सुरू असल्याने अधिकारीही धास्तावले. मांढरे विवाहित असल्याने मधला मार्ग निघू शकला नाही. शनिवारी सायंकाळी हुडकेश्वर पोलिसांनी बलात्कार आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Rape Against PSI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.