मनोरुग्णालयातून पळाला बलात्काराचा आरोपी

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:35+5:302015-09-03T23:05:35+5:30

मनोरुग्णालयातून पळाला बलात्काराचा आरोपी

Rape accused of fleeing from psychiatric hospital | मनोरुग्णालयातून पळाला बलात्काराचा आरोपी

मनोरुग्णालयातून पळाला बलात्काराचा आरोपी

ोरुग्णालयातून पळाला बलात्काराचा आरोपी
शौचालयाची तोडली खिडकी : मनोरुग्णालयाबाबत संशय
नागपूर : कोराडी रोडवरील शासकीय मनोरुग्णालयातून बुधवारी रात्री उशिरा बलात्काराचा आरोप असलेला एक कैदी शौचालयाची खिडकी तोडून पळाला. अखिल अहमद शेख असे फरार आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अखिल शेख भंडारा येथील रहिवासी आहे. तो भंडारा येथील एका गँगरेप प्रकरणात आरोपी आहे. मागील दोन वर्षांपासून तो भंडारा कारागृहात बंदिस्त होता. काही दिवसांपासून तो कारागृहात विचित्रपणे वागत होता. बडबड करणे आणि पागल याप्रमाणे वागत असल्याने त्याला १७ ऑगस्ट रोजी उपचारासाठी नागपुरातील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोरुग्णालयातील क्रिमिनल वॉर्ड क्रमांक ११ मध्ये त्याला ठेवण्यात आले होते. या वॉर्डावर नजर ठेवण्यासाठी दोन पोलीस शिपाई २४ तास तैनात होते; तरीही आरोपी शौचालयाची खिडकी तोडून पळाला तरी कुणाला याची कुणकुणही लागली नाही. सकाळी आरोपी अखिल वॉर्डात नसल्यामुळे खळबळ उडाली. शौचालयाची पाहणी केली तेव्हा खिडकीतील सळाखी वाकलेल्या होत्या. या घटनेनंतर आरोपी मनोरुग्ण असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनाने मानकापूर पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौकशी सुरू केली. डॉग स्क्वॉडचे श्वान राजनगर झोपडपट्टीला लागून असलेल्या वॉर्ड नंबर १५-१६ पर्यंत पोहोचले.
सूत्रानुसार भिंतीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झुडपात अखिलचा रुग्णालयातील शर्ट सापडला. घटनेनंतर क्रिमिनल वॉर्डातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासोबतच शौचालयाच्या खिडक्यासुद्धा जीर्ण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. यासंदर्भात मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमित नगरकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Rape accused of fleeing from psychiatric hospital